आवाहन

डिजिटल दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. यंदाचा अंक जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांक आहे. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी अंक बघितला असेलच. हा अंक काढण्यासाठी घेतलेली मेहनतही लक्षात आली असेल.

यानंतरचे अंकही असेच, किंबहुना याहूनही अधिक उत्तम काढता यावेत अशी इच्छा आहे. पण त्यासाठी करावा लागणारा प्रवास, त्यासाठीचं लागणारं तंत्रज्ञान या सगळ्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. आम्ही क्राउड फंडिंगसाठी जे फंडरेजर सुरू केलं होतं त्याची मुदत उद्या संपते आहे. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. पण त्यातून जो निधी जमलेला आहे तो फारच तुटपुंजा आहे. त्यामुळे अंक बघितल्यावर जर आपल्याला असं वाटत असेल की डिजिटल अंकांच्या या उपक्रमांसाठी मदत करावी तर प्लीज मला फेसबुकवर इनबॉक्समध्ये मेसेज करा किंवा इमेल करा. माझा इमेल आयडी आहे – sayali.rajadhyaksha@gmail.com मी माझ्या बँक अकाऊंटचे तपशील शेअर करेन.

प्लीज एक लक्षात घ्या, आर्थिक पाठबळ देण्याचा विचार स्वखुशीचा असावा. मदत करावी असं मनापासून वाटत असेल तरच मदत करा, त्यासाठी कुठलाही दबाव नाही. आणि मदत केली नाहीत म्हणून माझ्या मनात अजिबात वाईट भावना येणार नाही.

दिवाळीच्या शुभेच्छा!

सायली राजाध्यक्ष