जगातल्या सगळ्या खाद्यसंस्कृतीमध्ये ब्रेड हा एक अविभाज्य भाग आहे. जवळपास सगळ्या देशांमध्ये या ना त्या प्रकारे ब्रेड खाल्ला जातोच. त्यामुळे जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकात ब्रेडचा सहभाग अपरिहार्य आहे. या अंकात ब्रेडबद्दल समीर समुद्र यांचा एक सुरेख लेख आहेच. पण ब्रेडबद्दल आम्ही बोलायचं ठरवलं बेकिंग तज्ज्ञ सई कोरान्ने-खांडेकर यांच्याशी.
सईनं याविषयावर इतकी रंजक माहिती दिली आहे की ती ऐकताऐकताच ब्रेड करून बघितलाच पाहिजे असं वाटायला लागतं.