भातपिठल्याची गोष्ट आणि पाडस

आधुनिक मराठी स्त्री कथा लेखिकांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विजया राजाध्यक्ष. त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांचं वर्णन करणा-या कितीतरी कथा लिहिल्या. विदेही हा त्यांचा गाजलेला संग्रह. या संग्रहात भातपिठल्याची गोष्ट ही म्हटली तर विनोदाची बारीकशी झालर असलेली आणि म्हटली तर विचार करायला लावणारी कथा आहे.

पाडस हा मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या द इयरलिंग  या पुस्तकाचा राम पटवर्धन यांनी केलेला अनुवाद. जागतिक वाङ्मयातली ही एक महत्वाची इंग्रजी कादंबरी. या कादंबरीचा काळ आहे तो आता जवळपास पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा. कारण या कादंबरीचा अनुवाद होऊन जवळपास ५० वर्षं झाली आहेत. अमेरिकेच्या फ्लॉरिडा भागातलं एक जंगल. त्या जंगलात वयाच्या उतरणीला झालेल्या आपल्या लहान मुलाबरोबर राहणारं एक जोडपं. स्वतः शेतकाम करून गुजराण करणारं. हा लहान मुलगा जंगलात वडलांनी एका हरिणीची शिकार केल्यावर तिचं पाडस घरी घेऊन येतो. त्या पाडसाबरोबर त्याचं मोठ्या पुरूषात कसं रूपांतर होत जातं याची अत्यंत सुरेख कथा या पुस्तकात आहे. राम पटवर्धनांनी अनुवाद इतका सुंदर केलेला आहे की त्यातली नावं आणि वातावरण सोडलं तर हा अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन आहे असंच वाटतं.

यातल्या खाण्याचं वर्णनंही तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

13043563_10208475740951917_4949901898927169739_n

सीमा देशमुख या अभिनेत्री आहेत. अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.

One Comment Add yours

  1. Ujjwala Prashant Muley says:

    Bhat pithlyachi goshta apratim. Seema deshmukhana vachan kartana baghne ha ek sunder anubhav hota. tyanchya cheheryawarche expressions, awaz lajawab.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s