आदिवासी खाद्यसंस्कृती

यंदाचा डिजिटल दिवाळी अंक खाद्यसंस्कृती विशेषांक करायचा ठरवल्यावर, त्यात वेगवेगळ्या देशांच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या, धर्मांच्या, लोकसमुहांच्या खाद्यसंस्कृतींबद्दल शक्य तितकं जास्त साहित्य असावं असं वाटत होतं.

भारतातल्या प्रमुख खाद्यसंस्कृतींमधली एक महत्वाची खाद्यसंस्कृती म्हणजे आदिवासींची खाद्यसंस्कृती. आणि महाराष्ट्रातले आदिवासी म्हणजे प्रामुख्यानं गडचिरोली जिल्ह्यातले माडिया गोंड आदिवासी. तेव्हा त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घ्यायला गडचिरोलीला जाऊ असं मेधाताईनं सुचवलं. त्यानुसार राणीताई बंग यांच्याशी ती बोलली आणि आमचा तिथे जाण्याचा कार्यक्रम ठरला.

राणीताईंनी त्यांच्या सहका-यांबरोबर आमच्या या दौ-याचा अतिशय सुरेख आणि काटेकोर कार्यक्रम आखला होता. सर्चचे कार्यकर्ते बरोबर असल्यामुळे आम्हाला आदिवासींच्या घरांमध्ये, नव्हे स्वयंपाकघरांमध्ये विनासायास प्रवेश मिळाला. त्यांचे खाद्यपदार्थ चाखण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी त्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल गप्पा मारता आल्या.

या भागात माडिया गोंड, छत्तीसगढहून आलेले हल्बिया आणि ओरिसाहून आलेले उराव असे तीन आदिवासी समूह राहतात. तिन्ही समुहांची खाद्यसंस्कृती थोड्याफार फरकानं सारखीच आहे. इथे मुख्य पिक तांदळाचं घेतलं जातं. त्यामुळे तांदूळ आणि तांदळापासून बनणारे पदार्थ हेच यांचं मुख्य खाणं. जंगलात मिळणारे कंद, रानभाज्या आणि प्राणी हे कालवणांसाठी वापरले जातात. सोबत आसपासच्या पाण्यात मिळतील ते मासे. आदिवासींना कुठलाही प्राणी वर्ज्य नाही. बकरा, कोंबडा, डुक्कर, रानडुक्कर, नीलगाय, हरीण, घोरपड, माकड, घुबड, वटवाघूळ, मोर, पोपट, कबुतर, कवडे, तितर, बटेर असे सगळे प्राणी ते खातात. त्यामुळे या जंगलात फारसे प्राणी दिसत नाहीत. शिवाय बांबूचे कोंब, ज्याला ते वास्ते म्हणतात हीही त्यांच्या रोजच्या जेवणातली एक मुख्य भाजी. आदिवासी फक्त तेल, साखर आणि मीठ विकत आणतात. बाकी सगळं त्यांच्या घराच्या परसात जे पिकतं तेच खातात. अगदी हळद आणि मिरचीही परसातलीच.

कुठल्याही प्रकारचा संग्रह करायचा नाही हे एक त्यांचं महत्त्वाचं तत्व. आम्ही कितीतरी आदिवासी घरं बघितली. घरात एक चूल, ३-४ भांडी, काही ताटं-वाट्या, काही चटया इतकंच सामान. आता शहरीकरणाशी संबंध आल्यामुळे काही ठिकाणी हे चित्र बदलतं आहे. पण मूळ इतकंच सामान. त्यातच घर चालवायचं.

या सगळ्या संस्कृतीची एक झलक दाखवणारी ही एक लहानशी फिल्म. प्रसादनं या फिल्मसाठी खूप कष्ट घेतले आहेत.

4 Comments Add yours

 1. Sneha says:

  Astounding work!!

  Like

 2. मस्त अभ्यासपूर्ण आहे पण अभय बंग आणि गांधीजी याचा भाग चिटकावल्यासारखा वाटतो. मूळ विषयाशी सुसंगत नाही.

  Like

 3. Hemalee Bobhate says:

  Suruvat khupach chhan. hats of to the team for the efforts. Just couldn’t understand relevance of last few minutes on ‘Gandhijee’ and ‘a-swad vrat’.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s