भातपिठल्याची गोष्ट आणि पाडस

आधुनिक मराठी स्त्री कथा लेखिकांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विजया राजाध्यक्ष. त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांचं वर्णन करणा-या कितीतरी कथा लिहिल्या. विदेही हा त्यांचा गाजलेला संग्रह. या संग्रहात भातपिठल्याची गोष्ट ही म्हटली तर विनोदाची बारीकशी झालर असलेली आणि म्हटली तर विचार करायला लावणारी कथा आहे. पाडस हा मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या द इयरलिंग  या पुस्तकाचा राम…

भारतातली मुस्लिम खाद्यसंस्कृती

मुस्लिम खाद्यसंस्कृतीशिवाय भारतीय खाद्यसंस्कृतीचा विषय पूर्णच होऊ शकत नाही. बदायुनी लोकांनी भारतात ही खाद्यसंस्कृती आणली आणि इथल्या खाद्यसंस्कृतीनं तिला आपलंसं केलं. भारतातल्या इस्लामी खाद्यसंस्कृतीवर इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचाही मोठा प्रभाव पडलेला आहे. या खाद्यसंस्कृतीच्या या सगळ्या प्रवासाविषयी रंजक माहिती दिली आहे. खाद्यसंस्कृती अभ्यासक मोहसिना मुकादम यांनी. मोहसिना मुकादम या खाद्यसंस्कृती अभ्यासक आहेत. त्या रूईया महाविद्यालयात इतिहास…

माझा स्वयंपाक!

महेश एलकुंचवार हे लेखक म्हणून सगळ्यांनाच माहीत आहेत. पण महेशकाका फार उत्तम स्वयंपाक करतात आणि फार चवीनं जेवतात हे फार कमी जणांना माहीत आहे. १०-१२ वर्षांपूर्वी माझ्या सासुबाईंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर नागपूरला गेले होते. तेव्हा महेश काकांशी स्वयंपाकाबद्दल खूप गप्पा झाल्या. आम्ही दोघेही शाकाहारी, शिवाय दोघांच्या जेवणातल्या आवडी सारख्याच. त्यामुळे आमचं चटकन जमलं. डिजिटल…

ब्रेडची कहाणी

जगातल्या सगळ्या खाद्यसंस्कृतीमध्ये ब्रेड हा एक अविभाज्य भाग आहे. जवळपास सगळ्या देशांमध्ये या ना त्या प्रकारे ब्रेड खाल्ला जातोच. त्यामुळे जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकात ब्रेडचा सहभाग अपरिहार्य आहे. या अंकात ब्रेडबद्दल समीर समुद्र यांचा एक सुरेख लेख आहेच. पण ब्रेडबद्दल आम्ही बोलायचं ठरवलं बेकिंग तज्ज्ञ सई कोरान्ने-खांडेकर यांच्याशी. सईनं याविषयावर इतकी रंजक माहिती दिली आहे की…

कला आणि खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके कोणत्याही कालखंडात, कोणत्याही संस्कृतीत बनलेला खायचा पदार्थ हा कधीच एकेकटा येत नाही, तो आपल्या अंगभूत रंगपोतासहित त्या त्या प्रदेशातली धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये सोबत घेऊन येतो. त्यातूनच खाद्यसंस्कृती विकसित होत जाते. मानवी इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील या खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण लिखित माध्यमांमधून झाले, तसेच दृश्यमाध्यमांमधूनही झाले. अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी या चित्रांमधून जितक्या सुस्पष्टतेनं उलगडतात…

हॉट पॉट – चीन

अपर्णा अमित वाईकर                     सात वर्षांपूर्वी जेव्हा शांघायला आले तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की इथे माझ्यासाठी चायनीज फूडचं विविध पदार्थांनी भरलेलं एवढं मोठं ताट वाढून ठेवलंय! माझा नवरा अमित याची जर्मनीहून इकडे बदली झाल्यामुळे या सुंदर शहरात आम्ही २००९ मध्ये आलो. चीनमध्ये काहीही खातात, अगदी कुठलाही…

टेस्ट ऑफ पॅरडाइज – इराण

कल्याणी केदार कुमठेकर “आपलं पुढचं पोस्टिंग आता इराण आहे” असं माझ्या नवर्‍याने, केदारने मला सांगितलं तेव्हा खरंतर खूप भीती वाटली. “इराण? दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाही का आपल्याला जाता येणार?” मी प्रतिप्रश्न केला. त्यावर त्याचं नेहमीचं उत्तर – “कल्याणी,  पापी पेट का सवाल है. जाना तो पडेगा.” माझ्या नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्हांला वेगवेगळ्या देशांमध्ये राहायची संधी मिळते….

डिस्कव्हरिंग घाना

सचिन म. पटवर्धन व्हॉलंटरी सर्विस ओव्हरसीज (व्हिएसओ) ह्या संस्थेतर्फे परदेशातील व्हॉलंटीयरींगसाठी माझी २०१० साली निवड झाली. त्यांनी मला जे वेगवेगळे प्लेसमेंटचे पर्याय दिले होते, त्यात पहिला होता बोंगो नावाच्या गावाचा. बोंगो हे   घाना या देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातील गाव. घाना हा पश्चिम आफ्रिकेतला देश. मी हा पहिलाच पर्याय स्वीकारला. हे ऐकल्यावर त्यावेळी बऱ्याच जणांना वाटत…

खाद्यभ्रमंतीचं एल डोरॅडो! – पेरू

पुष्पक कर्णिक (अनुवाद साहाय्य – नीलेश अग्निहोत्री) एल डोरॅडो – संपन्न, समृद्ध असं काल्पनिक शहर १९९३ सालापासून ‘Word Travel Awards’ हे जागतिक पर्यटन उद्योगात विशेष मान्यताप्राप्त आणि अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांच्या निवड समितीवर विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती असतात. २०१२ ते २०१५ अशी  सलग चार वर्षं ‘World’s Leading Culinary Destination’ हा सन्मान…

टर्किश डिलाइट – २

पूजा देशपांडे तुर्कस्तानची खाद्यसंस्कृती जगातल्या तीन सर्वांत मोठ्या चायनीज, फ्रेंच या खाद्यसंस्कृतीप्रमाणेच एक संपन्न खाद्यसंस्कृती आहे. तुर्कींची खाद्यसंस्कृती ॲनाटेलिया, मेडिटेरियन, मिड्लइस्ट, पूर्व युरोप, मध्य आशिया येथील लोकांच्या एकत्र येण्यामुळे संपन्न व वैविध्यपूर्ण बनली आहे. पदार्थांची रेलचेल असल्यामुळे तुर्की खाद्यपदार्थ जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे तुर्कस्तानच्या प्रत्येक भागाची स्वतंत्र अशी खासियत आहे. हा देश स्वत:ला पुरेल…

प्रेमात पडायला लावणारी पाककला – ग्रीस

मेघना चितळे आणि विक्रम बापट ग्रीस हा देश युरोप, आफ्रिका आणि आशिया या खंडांच्या मध्यात वसलेला असून तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, ऑलिंपिकबरोबरच पाककलेसाठीही ग्रीस जगप्रसिद्ध आहे. ग्रीक खाद्यजीवनावर जगाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही खाद्यसंस्कृतींचा प्रभाव जाणवतो. दक्षिणेला असलेल्या भूमध्य समुद्रामुळे ग्रीसला वैशिष्ट्यपूर्ण हवामान लाभलं आहे. या हवामानामुळे ग्रीसमध्ये भाज्या, फळं, धान्य, मासे,…

कृतज्ञ खाद्यसंस्कृतीचा देश – जपान

विभावरी देशपांडे ‘जपान’- उगवत्या सूर्याचा देश ! जगभरातल्या खवय्यांसाठी ‘सुशी आणि रामेन’चा देश! जपानी लोकांची शिस्तप्रियता, नीटनेटकेपणा याबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत. मेड इन जपान, म्हणजे तर परिपूर्णता आणि गुणवत्ता यांची खात्रीच. मग जपानी खाद्यसंस्कृती तरी याला अपवाद कशी असेल? जपानी लोकांचं परफेक्शनचं वेड त्यांच्या खाद्यसंस्कृतीतही प्रतिबिंबित होतं. उगाच नाही टोक्योला जगातली सर्वोत्तम फूड सिटी…