चित्रलेखा चौधरी मेक्सिकोला जायचं ठरलं तेव्हा उत्साहाबरोबरच मनात थोडी धाकधूक होती. आधी जमैकाला जाऊन आल्यामुळे पॅकिंगचा थोडासा अनुभव होताच, पण तरी मेक्सिकोला काय मिळते,काय जेवण असते याबद्दल गुगलवर शोधणं चालू केले. तिकडे चिकन, मटण, मासे खात असतील याचा अंदाज होता पण गुगलवर शोधल्यावर कळलं की मेक्सिकोत चित्रविचित्र किडेदेखील खातात. पण मी चिकन आणि कधीतरी मटण आणि मासे खाते आणि शिवाय…
Category: परदेशी खाद्यसंस्कृती
टेस्ट ऑफ पॅरडाइज – इराण
कल्याणी केदार कुमठेकर “आपलं पुढचं पोस्टिंग आता इराण आहे” असं माझ्या नवर्याने, केदारने मला सांगितलं तेव्हा खरंतर खूप भीती वाटली. “इराण? दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाही का आपल्याला जाता येणार?” मी प्रतिप्रश्न केला. त्यावर त्याचं नेहमीचं उत्तर – “कल्याणी, पापी पेट का सवाल है. जाना तो पडेगा.” माझ्या नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्हांला वेगवेगळ्या देशांमध्ये राहायची संधी मिळते….
डिस्कव्हरिंग घाना
सचिन म. पटवर्धन व्हॉलंटरी सर्विस ओव्हरसीज (व्हिएसओ) ह्या संस्थेतर्फे परदेशातील व्हॉलंटीयरींगसाठी माझी २०१० साली निवड झाली. त्यांनी मला जे वेगवेगळे प्लेसमेंटचे पर्याय दिले होते, त्यात पहिला होता बोंगो नावाच्या गावाचा. बोंगो हे घाना या देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातील गाव. घाना हा पश्चिम आफ्रिकेतला देश. मी हा पहिलाच पर्याय स्वीकारला. हे ऐकल्यावर त्यावेळी बऱ्याच जणांना वाटत…
खाद्यभ्रमंतीचं एल डोरॅडो! – पेरू
पुष्पक कर्णिक (अनुवाद साहाय्य – नीलेश अग्निहोत्री) एल डोरॅडो – संपन्न, समृद्ध असं काल्पनिक शहर १९९३ सालापासून ‘Word Travel Awards’ हे जागतिक पर्यटन उद्योगात विशेष मान्यताप्राप्त आणि अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांच्या निवड समितीवर विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती असतात. २०१२ ते २०१५ अशी सलग चार वर्षं ‘World’s Leading Culinary Destination’ हा सन्मान…
टर्किश डिलाइट – २
पूजा देशपांडे तुर्कस्तानची खाद्यसंस्कृती जगातल्या तीन सर्वांत मोठ्या चायनीज, फ्रेंच या खाद्यसंस्कृतीप्रमाणेच एक संपन्न खाद्यसंस्कृती आहे. तुर्कींची खाद्यसंस्कृती ॲनाटेलिया, मेडिटेरियन, मिड्लइस्ट, पूर्व युरोप, मध्य आशिया येथील लोकांच्या एकत्र येण्यामुळे संपन्न व वैविध्यपूर्ण बनली आहे. पदार्थांची रेलचेल असल्यामुळे तुर्की खाद्यपदार्थ जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे तुर्कस्तानच्या प्रत्येक भागाची स्वतंत्र अशी खासियत आहे. हा देश स्वत:ला पुरेल…
प्रेमात पडायला लावणारी पाककला – ग्रीस
मेघना चितळे आणि विक्रम बापट ग्रीस हा देश युरोप, आफ्रिका आणि आशिया या खंडांच्या मध्यात वसलेला असून तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, ऑलिंपिकबरोबरच पाककलेसाठीही ग्रीस जगप्रसिद्ध आहे. ग्रीक खाद्यजीवनावर जगाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही खाद्यसंस्कृतींचा प्रभाव जाणवतो. दक्षिणेला असलेल्या भूमध्य समुद्रामुळे ग्रीसला वैशिष्ट्यपूर्ण हवामान लाभलं आहे. या हवामानामुळे ग्रीसमध्ये भाज्या, फळं, धान्य, मासे,…
कृतज्ञ खाद्यसंस्कृतीचा देश – जपान
विभावरी देशपांडे ‘जपान’- उगवत्या सूर्याचा देश ! जगभरातल्या खवय्यांसाठी ‘सुशी आणि रामेन’चा देश! जपानी लोकांची शिस्तप्रियता, नीटनेटकेपणा याबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत. मेड इन जपान, म्हणजे तर परिपूर्णता आणि गुणवत्ता यांची खात्रीच. मग जपानी खाद्यसंस्कृती तरी याला अपवाद कशी असेल? जपानी लोकांचं परफेक्शनचं वेड त्यांच्या खाद्यसंस्कृतीतही प्रतिबिंबित होतं. उगाच नाही टोक्योला जगातली सर्वोत्तम फूड सिटी…
भारतीय आणि अफ्रिकन पाकशैलीचे फ्युजन – त्रिनिदाद
गौरव सबनीस न्यू यॉर्कमध्ये राहात असणाऱ्या क्रिकेटप्रेमीला जर कुठे प्रत्यक्ष जाऊन क्रिकेट पाहायचे असेल तर स्वस्त आणि सोईस्कर पर्याय म्हणजे वेस्ट इंडीज. जेमतेम चार-पाच तासांचा विमान प्रवास. शिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेने त्यांचे डॉलर त्यातल्या त्यात किरकोळ असल्यामुळे हॉटेल, खाणे-पिणे, प्रवास वगैरे अगदी परवडण्यासारखे. भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर येणार हे कळताच मी इंटरनेटवर जाऊन…
मत्स्याहारी नॉर्वे
स्नेहा काळे नॉर्वे हा जेमतेम ५० लाख लोकवस्ती असलेला देश. म्हणजे आपल्या पुण्याएवढी लोकवस्ती म्हणा ना. पण अतिशय संपन्न आणि त्यामुळे महागडासुद्धा. त्यात सफरचंद आणि बेरीज सोडले तर फारसे काही पिकत नाही. सर्व काही आयात. जगाच्या नकाशावर पाहिले तर अगदी छोटासा देश. पण खडकाळ समुद्र किनारा आणि विलोभनीय सृष्टीसौंदर्याने नटलेला. त्यामुळे नॉर्वेजिअन लोकसुद्धा निसर्गप्रेमी. हवामानात…
वारूणीचा प्रदेश – जर्मनी
जयश्री हरि जोशी सर्जक, कलात्मक आणि शास्त्रीय क्षेत्रात सातत्यानं नवनवी शिखरे गाठणारा जर्मनी हा देश – कवींचा आणि विचारवंतांचा देश. फ्रान्ससारखे जिव्हालौल्याचा अनुनय करणारे, कोरीव, नाजूक, जीवघेण्या कलाकुसरीचे देणे ह्या खाद्यसंस्कृतीला लाभलेले नाही आणि इटलीच्या बेभान, उत्सवपूर्ण आणि जगण्याचा, रोजच्या खाण्यापिण्याचाही अगदी सोहळा करून टाकण्याच्या वृत्तीचा परीसस्पर्श ह्या भूमीच्या पाकशास्त्राला झालेला नाही. समुद्रसपाटीचे प्रदेश, डोंगरमाथे,…
झटपट आणि सोपी खाद्यसंस्कृती – नेदरलंड
तृप्ती फायदे-सावंत असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटामधून जातो.. फक्त पुरुषाच्या कशाला? आपल्यापैकी कित्येकांच्या हृदयाचे रस्ते पोटातूनच जात असतील. भारतासारख्या देशात जिथे प्रत्येक प्रांतागणिक खाद्यसंस्कृती बदलते, तिथे आपल्याला एखाद्या नवीन देशाची खाद्यसंस्कृती आवडणे म्हणजे जरा कठीणच आणि त्यातून एखादी माझ्यासारखी, जिने शिक्षण आणि नोकरीसाठी या आधी कधी मुंबईबाहेरही पाऊल ठेवलं नाही तिला तर…
परदेशी खाद्यसंस्कृतीचा रसाळ अनुभव
आदिती चांदे-अभ्यंकर प्रत्येक देशाची अशी एक विशिष्ट खाद्यसंस्कृती असते. भारतीय खाद्यसंस्कृतीत तर प्रचंड वैविध्य आहे. आपण पर्यटनासाठी अथवा वास्तव्यासाठी परदेशात गेलो असता शक्यतो आपली खाद्यसंस्कृती जपायचा आटोकाट प्रयत्न करतो. तेथेही आपलेच पदार्थ विकत मिळवायचा, उपलब्ध साहित्यातून आपल्या पद्धतीच्या जवळपास जाणारे पदार्थ करायचा सतत प्रयत्न सुरू असतो आपल्या बहुतेकांचा. म्हणूनच परदेशी पर्यटनास नेणाऱ्या कंपन्यांची चौकशी करताना…