टकर बॅग – ऑस्ट्रेलिया

भाग्यश्री परांजपे सन १७८९. गुन्हेगारांच्या त्या वसाहतीत कोर्ट भरलं होतं. फाटकेतुटके आणि कमालीचे मळलेले कपडे घातलेले निराश, हताश चेहऱ्यांचे स्त्रीपुरुष घोळका करून उभे होते.  उपासमारीने बऱ्याच जणांच्या हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. एक गणवेशाचा फरक सोडला तर शिपाई आणि गुन्हेगारांची अवस्था सारखीच होती. सुनावणी सुरू झाली. आरोपीने दुसऱ्या एका दुर्बल गुन्हेगाराच्या हातातला ब्रेडचा तुकडा हिसकावून खाल्ला…

स्थलांतरितांच्या खाद्यसंस्कृतीचं घर – ऑस्ट्रेलिया

श्रुतकिर्ती पुंडे-काळवीट अनेकविध देशांमधील संस्कृतीचा स्वीकार करत गेल्याने ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृती दिवसागणिक बदलत गेली आहे. बदल हेच तिच्या समृद्ध होत जाण्याचं कारण आहे. एके काळी नवीन, परकीय असलेले घटक आणि पद्धती आता इथल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. फळं आणि भाज्या, मासे आणि मांसाहार, चीज अशा सर्वच खाद्यप्रकारांमध्ये ऑस्सींनी स्थलांतरितांच्या संस्कृतीला सामावून घेतलं आहे. इंग्रजांच्या…

सर्वसमावेशक खाद्यसंस्कृती – सुरिनाम

डॉ. विश्वास अभ्यंकर जगात कुठेही गेलात तरी त्या त्या देशाची खरी ओळख ही तिथल्या विशिष्ट अशा खाद्यपदार्थातूनच होते हे एक अलिखित सत्यच म्हणायला हवं. आणि काही देश असे असतात, ज्यांची नावं आणि भौगोलिक स्थानंच फक्त आपल्याला माहिती असतात आणि बाकी फारशी काही माहिती नसते. असाच एक देश म्हणजे ‘सुरिनाम’. दक्षिण अमेरिका खंडातला, क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आणि नेदरलँड्सव्यतिरिक्त जेथे डच…

चिनी शाकाहारी पाहुणचार

शर्मिला फडके स्थळ : श्यूचं घर काळ : ड्रॅगन फेस्टिवल त्या आठवड्यात चिनी सण होता – ड्रॅगन फेस्टीवल. सुझन म्हणजे श्यू.  तिचा एसएमएस आला, “मी आईवडिलांच्या घरी जाणार आहे. तुला यायचंय का?” मी एका पायावर तयार झाले. श्यूचे वडील होंगियानपासून जरा लांब, लिन हाय नावाच्या शहराजवळ राहात होते. त्यांच्या पीचच्या बागा होत्या. ताज्या, तयार पीचची…

द रॉयल डच! – नेदरलंड

डॉ. विश्वास अभ्यंकर जर एखाद्या डच माणसाला तुम्ही विचारलंत की डच पाककृतीमध्ये विशेष काय आहे ? तर तो तोंड वेड-वाकडं करेल, खांदे उडवेल आणि कदाचित माफी पण मागेल, कारण तसं विशेष त्यांच्याकडे काही नाही. भारत, चीन, थायलंड, इंडोनेशिया हे सर्वच देश तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे आणि खाद्यपदार्थांमध्ये असलेल्या वैविध्यतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. पण नेदरलँड्ससारखेही काही देश आहेत…

खाद्यसंस्कृतींचा संकर – मॉरिशस

सई कोर्टीकर मॉरिशस. सुंदर निसर्गसृष्टी, भव्य समुद्रकिनारा, पांढरी वाळू, नितळ समुद्रतळ आणि सगळीकडे हिरवळ. चारही बाजूंनी समुद्रकिनारा असल्यामुळे इकडे पावसाच्या तुरळक सरी वर्षभर पडत असतात. इकडे पहिल्यांदा, मार्च २०१६ मध्ये येण्याआधी मनात प्रश्न होते. तिथली माणसं कशी असतील, राहणीमान कसं असेल, आपलं नीट निभावेल की नाही वगैरे. माझ्या सासूबाईंना तर विशेष काळजी. मुलं पहिल्यांदा परदेशी…

कम्फर्ट फूडची परमावधी – ब्रिटिश फूड

शैलेन भांडारे “ए नेशन इन नीड ऑफ अ बिग, वॉर्म हग” लहानपणी ‘अॅस्टेरिक्स’च्या कॉमिकमध्ये एक प्रसंग वाचलेला आठवतो. अॅस्टेरिक्स आणि त्याचे मित्रवर्य ऑबेलीक्स हे दोघे ‘गॉल्स’ म्हणजे फ्रेंच भिडू, रोमन लोकांनी सक्तीची सैन्यभरती करवलेल्या एका तरुणाला सोडवायला स्वतःच रोमन सैन्यात भरती झाले. त्यांच्या सैनिकी तुकडीत रोमन साम्राज्यातले इतरही अनेक प्रजाजन होते – म्हणजे स्पॅनिश, जर्मन,…

शिकाम्बा-मशाम्बा – मोझांबिक

कल्याणी कुमठेकर २०१२ च्या डिसेंबर महिन्यात आम्ही आफ्रिकन सफारीसाठी टांझानियामध्ये गेलो होतो. तो एक वेगळाच अनुभव होता. ओपन लँडक्रुझरमधून जंगलात दिवसभर प्राणी पाहत भटकायचं, त्या स्वछंद प्राण्यांच्या विश्वात ना वेळेचं भान, ना भुकेचं. या आठवणी ताज्या असतानाच केदारला, माझ्या नवऱ्याला मोझाम्बिकचं प्रोजेक्ट मिळालं. मुलं तर भयंकर खुशीत होती. कारण आफ्रिकन सफारी ही त्यांची आतापर्यंत घालवलेल्या…

अरेबिक तहजीब-ए-जायका

अरुणा धाडे मला असं वाटतं, श्वासाएवढंच  महत्वाचं असतं खाणं. मोरोकोपासून पर्शियन गल्फपर्यंत पसरलेल्या बावीस देशातल्या वीस कोटी अरब लोकांच्या बाबतीत ते वेगळं कसं असू शकतं? आखाती अरबांचं आजचं खाद्यजीवन हा पर्शियन, भारतीय, लेबनीज, चिनी, टर्किश अशा विविध खाद्यसंस्कृतींचा मिलाफ आहे. सततची भटकंती, टोळीयुद्धं, लूटमार, आक्रमणं, जीवघेण्या सागरसफरी, हवामानातले उतार-चढाव असे विविध टप्पे पार करत करत…

वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स

डॉ. प्रियांका देवी-मारूलकर जर आपण ‘रातातुई’ किंवा ‘ज्युली अँड ज्युलिया’ नावाचे सिनेमे पाहिले असतील तर त्यात आपल्याला अत्यंत रोचक अशा फ्रेंच खाद्यसंस्कृतीची ओळख होते. अनेक शतके विकसित होत आलेले आणि बदलत राहिलेले फ्रेंच पाकशास्त्र म्हणजेच ‘ला क्युझिन फ्रान्से’. हे युरोपातील नावाजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण असे पाकशास्त्र आहे. २०१० मध्ये युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये फ्रेंच गॅस्ट्रोनॉमीचा समावेश करून…

गुटेन आपेटिट – जर्मनी

शिल्पा गडमडे-मुळे Wenn der Magen voll ist, singen die Vögel und die Menschen lachen. जेव्हा पोट भरलेलं असतं तेव्हा पक्षी गात असतात आणि माणसं हसत असतात. आपल्याकडे जेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक म्हटला जातो. जेवणाकडे केवळ ‘उदरभरण’ या दृष्टीने न पाहता ‘अन्न पूर्णब्रह्म आहे’ हे लक्षात घ्या, या अर्थाचा हा श्लोक आहे. जेवण किंवा…

चिनी आणि भारतीय रूचींचा मिलाफ – मलेशिया

स्नेहा पांडे लहानपणापासूनच चटकमटक खाण्याची सवय. मला रोज तेच खायला आवडायचं नाही आणि त्याहून तेच तेच पदार्थ बनवायला तर मुळीच नाही. त्यावेळी पोटात सगळं गेल पाहिजे म्हणून आई अगदी मागे लागून युक्तीयुक्तीने सगळं खाऊ घालायची. मग लग्नानंतर मी आणि माझा नवरा दोघेच पुण्यात राहू लागलो. तेव्हापासून माझी स्वयंपाकाची आवड खरी सुरु झाली. वेगवेगळे पदार्थ करून…