मासे, तांदूळ आणि नारळ – केरळ

तनश्री रेडीज लग्नाच्या आधी मी आणि माझा होणारा नवरा असे दोघेही हॉस्टेलला राहत असल्याने हॉस्टेल मेसमध्ये मिळणारे जेवण हेच महाराष्ट्रीय जेवण असा जो सर्वसाधारण नॉन महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज होतो तसाच माझ्या केरळी नव-याचा सुद्धा झाला होता आणि तेव्हापासून माझी केरळी खाद्यसंस्कृतीशी ओळख झाली. “We Mallus have better food culture than you people. We have variety…

लोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश

शक्ती साळगावकर-येझदानी हिमाचल प्रदेश हे नावच इतकं सुंदर आहे, की हे नाव ऐकताच सुंदर बर्फाची पांढरीशुभ्र ओढणी घेऊन स्वागताला उभी असलेली एक स्त्री डोळ्यासमोर येते. मी पहिल्यांदा या सुंदर प्रदेशात जायचा प्लॅन केला तो एका पंधरा दिवसाच्या ट्रेकिंग ट्रिपसाठी. टूर कंपनीने पाठवलेल्या, ट्रिपवर नेण्याच्या सामानाच्या यादीत माकडटोपी, लाँग जोनस् (लोकरीचा पायजमा), लोकरीचे पायमोजे, मफलर, लेदरचे…

मासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा

मनस्विनी प्रभुणे -नायक गोवेकरांचं पहिलं प्रेम हे फक्त आणि फक्त ‘नुस्त्यां’वर (मासळीवर) असतं. इथे मासळीला ‘नुसते’असं म्हणालं जातं. मासळीशिवाय गोमंतकीयांचे जेवण अपूर्ण आहे. मासळी बाजारात गेल्यावर स्वतःपेक्षा शेजारची व्यक्ती कोणती मासळी घेतेय याकडे जास्त लक्ष असतं. रस्त्यात कोणी भेटला तर त्याची ख्यालखुशाली विचारण्याऐवजी ‘आज कोणते नुसते आणले?’ हे सहज विचारलं जातं. कोणाचा फोन आला तर गप्पांमध्येही आज…

उपेक्षित खाद्यसंस्कृती – आसाम

किमया कोल्हे आसाम म्हटलं की डेाळ्यासमोर येतो तो हिरवागार डोंगर, लांबच लांब चहाचे मळे आणि डोक्याला कपडा बांघून आणि पाठीला टोपली लावून चहा वेचणा-या आसामी बायका नाही का? निदान मला तरी तितकच माहीत होतं. जगभरातल्या एकूण चहा उत्पादनापैकी ६ टक्के चहा हा आपल्या आसाममध्ये होतो असे भूगोलात शिकवले होते किंबहुना पाठच करून घेतलेले शाळेत. त्यामुळे…

झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल – आंध्र प्रदेश

विद्या सबनीस काही वर्षांपूर्वी माझ्या पतीची बदली आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्री या शहरात झाली. राजमुंद्री हे विशाखापट्टणमच्या जवळ आणि गोदावरीच्या काठावर वसलेलं टुमदार शहर आहे. इथे गोदावरी नदीचं पात्र इतकं मोठं आहे की तो समुद्र असावा अशी शंका यावी. माझे पती पूल बांधकामातले तज्ज्ञ आहेत. राजमुंद्रीतल्या नदीवर तीन किलोमीटर लांबीचा रेल्वे ब्रिज बांधला जाणार होता. आम्ही…

दस्तरखान

प्राची सोमण दस्तरखानचा शब्दशः अर्थ जेवताना (मेजवानीच्या वेळी) खाली अंथरण्याचा गालिचा. पण हा शब्द एकूणच जेवणाची तयारी, खाण्याची जागा, जेवणाचा सरंजाम यासाठी वापरला जातो. साधारण सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा कानपूरला राहायला यायचं पक्कं झालं तेव्हा, ‘माझं कसं होणार ?’ हा प्रश्न पडण्याइतकी अल्लड मी नव्हते. पण उत्तर प्रदेश, तिथलं हवामान, राहणीमान याबद्दल आपण बरेचदा फारसं चांगलं…

भोजोन राषिक बांगाली – पश्चिम बंगाल

प्रीती देव धोनो धान्यो पुष्पे भोरा, अमादेर एई बोशुनधोरा ताहार माझे आछे देश एक, शोकोल देशे शेरा…… ओ शे शोप्नो दिये तोईरी शे जे श्रीष्टी दिये घेरा….. द्विजेंद्रलाल रॉय ह्यांनी संपूर्ण वसुंधरेची स्तुती करत बंगालचीही स्तुती केली आहे. ह्या कवितेतून बंगालची सुंदरता आपल्या डोळ्यांपुढे येते.  निसर्गसानिध्यातल्या बंगाल प्रदेशात पंधरा वर्षं राहून तिथल्या संस्कृतीविषयी वेगळीच आपुलकी…

देवभूमीची खाद्ययात्रा – गढवाल

अनन्या मोने देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं उत्तराखंड. त्यातला गढवाल प्रांत हा हरिद्वारपासून उत्तरकाशीपर्यंत पसरलेला आहे. त्याचे पौरी गढवाल, तेहरी गढवाल, चमोली गढवाल हे काही भाग अभयारण्य आणि हिमशिखरांसाठी प्रसिद्ध आहेत. जून १५ मध्ये मी ‘हर कि दून’ हा ट्रेक केला. तेव्हा त्या भागातलं गढवाली जीवन जवळून पाहायला मिळालं.  ट्रेक करण्याआधी आम्ही ऋषिकेशला जाऊन राफ्टिंग केलं….

दोन राज्यं, दोन खाद्यसंस्कृती

स्वाती शिंदे-जैन जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म…..हा लहानपणी जरी फक्त एक श्लोक वाटला तरी हॉस्टेलच्या लाईनमध्ये लागल्यावर जेव्हा ताटात  जेवण म्हणून जे काही आलं, ते बघून खरंच ब्रह्मदेव आठवले.  दक्षिणेतील त्या शहरात पोळी तर  मिळणार नाही हे एव्हाना लक्षात आलं होतं. त्यामुळे मग भात आणि त्यावर डाळ फ्राय म्हणून सांगण्यात आलेलं वरण आणि सोबत…

बोढिया उडिशा

मूळ लेखिका : मोनालिसा पांडा मराठीकरण : अश्विनी दस्तेनवर ओरिसा. आपण मराठी लोक ओरिसा म्हणतो. तिथले लोक ‘उडिशा’ म्हणतात. त्यांच्या बोलीभाषेतला ‘ड’चा उच्चार ‘र’च्या आसपासचा असतो. शिवाय ‘स’ ला ‘श’ म्हणायचीही प्रथा आहे. शिवाय ‘उ’च्या जागी बंगाल्यांप्रमाणे ‘ओ’ म्हणायचीही प्रथा आहे. हे भारताच्या पूर्व किनारपट्टीलगतचं राज्य. प्राचीन भारतातलं या राज्याचं नाव कलिंग. भौगोलिक स्थानाचा प्रभाव…

खाणारा-खिलवणारा मध्यप्रदेश

कथन – भारती दिवाण शब्दांकन – वंदना खरे आमचा मध्यप्रदेश अनेक कारणांसाठी सुप्रसिद्ध आहे. खजुराहोचे मंदीर, कान्हा किसली नॅशनल पार्क, महेश्वरी साडी, सांचीचा स्तूप, इंदौरच्या अहिल्याबाई होळकर, भोपाळची नवाबी संस्कृती, कुमार गंधर्वांचं गाणं या सर्वांसोबतच मध्यप्रदेशातलं खाणं-खिलवणंदेखील प्रसिद्ध आहे! मध्यप्रदेशची माव्याची जलेबी, गजक, इंदौरी चिवडा, दही कचोरी, छल्ला कचोरी, मावा वाटी असे अनेक पदार्थ खवय्यांना…

अमे गुजराती

प्रज्ञा पंडित लहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घेण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत  गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या…