ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट

नीरजा पटवर्धन एक होती ठकू. स्वैपाकाच्या बाबतीत महानाठाळ. आईने स्वैपाक शिकवायचा प्रयत्न केला, पण ठकूने कधी दाद दिली नाही. कॉलेजबरोबर हजारो उद्योग असत, त्यामुळे ठकू घरी कमीच असे. मुळात स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच ठकूला फारशी पसंत नव्हती. वरण-भात आणि भरपूर दूधसाखरवाली उकळी कॉफी हे दोनच पदार्थ होते, जे ठकूला कुणाच्याही मदतीशिवाय सुरुवातीपासून शेवटापर्यंत…

एकट्या माणसाचं स्वयंपाकघर

सचिन कुंडलकर माझी लहानपणीची आमच्या पुण्याच्या स्वयंपाकघराची आठवण ही, जिथे खूप आणि सतत जेवण बनत असते, ही आहे. आमचे स्वयंपाकघर कधीही दुपारचे शांत डोळे मिटून लवंडलेले पाहिल्याचे मला आठवत नाही. आमचे घर अतिशय प्रशस्त आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. घरी कुलदैवत असल्याने कुळाचार वर्षभर होतात आणि माझे आईवडील मनाने अतिशय अघळपघळ, प्रेमळ देशस्थ आहेत, हे…