मालिकांमधलं स्वयंपाकघर

मराठी-हिंदी मालिकांनी भारतातल्या प्रेक्षकांना वेड लावलेलं आहे. या मालिका भारतीय माणसाच्या, विशेषतः वयस्कर व्यक्तींच्या भावजीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या आहेत. या मालिका दररोज दाखवल्या जातात. दररोज दाखवल्या जात असल्यामुळे अर्थातच त्यात स्वयंपाक, स्वयंपाकघर आणि खाणंपिणं आलंच. काही मालिकांमध्ये तर फक्त खाणंपिणंच दाखवलं जातं असंही विनोदानं म्हटलं जातं. शुभांगी गोखले यांनी अनेक मालिकांच्या स्वयंपाकघरात खूप तन्मयतेनं…

मद्यपान – एक चिंतन

आपल्या देशात आणि एकूणच संस्कृतीत मद्यपानाकडे फार चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. तर परदेशात मद्य हा बहुतेक खाद्यसंस्कृतींचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग हा फरक का? शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का? यासारख्या विचार करायला लावणा-या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे हृषीकेश जोशी यांनी आपल्या मद्यपान – एक चिंतन या लेखात. त्यांचा हा…

माझे खाद्यजीवन

पु.ल.देशपांडे यांचं एक एव्हरग्रीन पुस्तक हसवणूक. रोजच्या जगण्यातल्या गंमतीदार निरीक्षणांमधून पुलंचा विनोद निर्माण होतो. ‘माझे खाद्यजीवन’ हे हसवणूक पुस्तकातलं प्रकरण खळखळून हसवणारं. जेवणातले विविध रंग, विविध चवी यांचं तितकंच चविष्ट वर्णन पुलंनी आपल्या या लेखातून केलं आहे. पुलंच्या लेखातल्या भागाचं वाचन करायचं तर अतुल परचुरेंशिवाय कोण करणार! अतुल परचुरे हे अभिनेता आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून,…

खमंग

मुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह. यातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक…

बलुतं

दलित आत्मकथनं हा मराठी साहित्यातला एक ठेवा आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ पुस्तकाने दलित आत्मचरित्राचा पाया घातला. ‘बलुतं’ने दलितांचं जे जगणं व्यक्त झालं त्याने मराठी वाचक हादरून गेले. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचा जीवनसंघर्ष व्यापकपणे सर्वांसमोर आला. या पुस्तकातला दलित खाद्यसंस्कृतीचं आकलन करून देणारा भाग वाचला आहे कौशल इनामदार यांनी. संगीतकार-गायक. मराठीच्या संवर्धनासाठी काम करणारे शिलेदार.

आयदान

मुळात स्त्रीचं जगणं पुरूषांच्या तुलनेत अवघड. त्यातही दलित स्त्री म्हणजे स्त्रीत्व आणि दलितत्व असा दुहेरी संघर्ष. दलित म्हणजे काय याची जाणीव झाल्यापासून एक स्त्री म्हणून जे जगणं वाट्याला आलं, त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचं आयुष्य ऊर्मिला पवार यांनी ‘आयदान’मधून मांडलं आहे.  आयदानमधला खानपानाबद्दलचा हा उतारा वाचला आहे चिन्मयी सुमीत यांनी. अभिनेत्री. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून…

अनंताश्रम

मुंबईतलं  गिरगावच्या सुप्रसिद्ध  खोताच्या वाडीतलं,  मुंबईच्या अस्सल कोकणी– गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारं अनंताश्रम. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी तर अनंताश्रमाची खुली जाहिरात करणं बाकी ठेवलं होतं असं म्हटलं जायचं. ते गिरगावातून दादरमध्ये राहायला गेले तरी गिरगावातल्या या खडप्यांच्या अनंताश्रमाला  विसरले नाहीत. दळवींचं खाण्यापिण्याबद्दलचं प्रेम सर्वश्रुतच होतं. मध्यमवर्गीय माणूस कदाचित पायही ठेवणार नाही अशी अनवट रेस्टॉरंट्स हुडकून दळवी तिथे…