परदेशी खाद्यसंस्कृतीचा रसाळ अनुभव

आदिती चांदे-अभ्यंकर प्रत्येक देशाची अशी एक विशिष्ट  खाद्यसंस्कृती असते. भारतीय खाद्यसंस्कृतीत तर प्रचंड वैविध्य आहे. आपण पर्यटनासाठी अथवा वास्तव्यासाठी परदेशात गेलो असता शक्यतो आपली खाद्यसंस्कृती जपायचा आटोकाट प्रयत्न करतो. तेथेही आपलेच पदार्थ विकत मिळवायचा, उपलब्ध साहित्यातून आपल्या पद्धतीच्या जवळपास जाणारे पदार्थ करायचा सतत प्रयत्न सुरू असतो आपल्या बहुतेकांचा. म्हणूनच परदेशी पर्यटनास नेणाऱ्या कंपन्यांची चौकशी करताना…

स्थलांतरितांच्या खाद्यसंस्कृतीचं घर – ऑस्ट्रेलिया

श्रुतकिर्ती पुंडे-काळवीट अनेकविध देशांमधील संस्कृतीचा स्वीकार करत गेल्याने ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृती दिवसागणिक बदलत गेली आहे. बदल हेच तिच्या समृद्ध होत जाण्याचं कारण आहे. एके काळी नवीन, परकीय असलेले घटक आणि पद्धती आता इथल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. फळं आणि भाज्या, मासे आणि मांसाहार, चीज अशा सर्वच खाद्यप्रकारांमध्ये ऑस्सींनी स्थलांतरितांच्या संस्कृतीला सामावून घेतलं आहे. इंग्रजांच्या…

ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट

नीरजा पटवर्धन एक होती ठकू. स्वैपाकाच्या बाबतीत महानाठाळ. आईने स्वैपाक शिकवायचा प्रयत्न केला, पण ठकूने कधी दाद दिली नाही. कॉलेजबरोबर हजारो उद्योग असत, त्यामुळे ठकू घरी कमीच असे. मुळात स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच ठकूला फारशी पसंत नव्हती. वरण-भात आणि भरपूर दूधसाखरवाली उकळी कॉफी हे दोनच पदार्थ होते, जे ठकूला कुणाच्याही मदतीशिवाय सुरुवातीपासून शेवटापर्यंत…

सर्वसमावेशक खाद्यसंस्कृती – सुरिनाम

डॉ. विश्वास अभ्यंकर जगात कुठेही गेलात तरी त्या त्या देशाची खरी ओळख ही तिथल्या विशिष्ट अशा खाद्यपदार्थातूनच होते हे एक अलिखित सत्यच म्हणायला हवं. आणि काही देश असे असतात, ज्यांची नावं आणि भौगोलिक स्थानंच फक्त आपल्याला माहिती असतात आणि बाकी फारशी काही माहिती नसते. असाच एक देश म्हणजे ‘सुरिनाम’. दक्षिण अमेरिका खंडातला, क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आणि नेदरलँड्सव्यतिरिक्त जेथे डच…

मुलं आणि पौष्टिक खाणं

मधुरा देव आज सकाळपासून दुसऱ्या, आठवड्यातल्या पाचव्या आणि महिन्यातल्या कितव्यातरी तक्रारीचं निराकरण करायच्या प्रयत्नात होते. तक्रार तरी कसं म्हणायचं याला? अक्षरशः हवालदिल झालेल्या पालकांना धीर देणे, हे मुख्य काम होऊन गेलं आहे. हरकत नाही! पालक आणि मूल हे वेगळं काढता येतच  नाही. परस्परावलंबी आहे हे नातं! इतर नात्यांपेक्षा जरा अधिक जबाबदारीची मागणी असलेलं. तर तक्रार…

एका चवीचं जन्मरहस्य उलगडताना

आशय गुणे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईत, ‘मरिन लाईन्स’ला ‘ग्रीन ओनियन’ ( Green Onion) नावाचे एक रेस्तरॉ आहे. त्या वेळेस मी एका ‘ऑनलाईन ट्रॅव्हल मार्केटप्लेस’ असलेल्या कंपनीत कामाला असल्यामुळे या रेस्तरॉशी संबंधित असलेल्या ‘हॉटेल सपना मारिन’शी माझा व्यावसायिक संबंध येत असे. तिथल्या भेटीच्या वेळी माझ्या लक्षात आलं की, या रेस्तरॉमध्ये नायजेरियन पद्धतीचं जेवण मिळतं. त्यामुळे…

एकट्या माणसाचं स्वयंपाकघर

सचिन कुंडलकर माझी लहानपणीची आमच्या पुण्याच्या स्वयंपाकघराची आठवण ही, जिथे खूप आणि सतत जेवण बनत असते, ही आहे. आमचे स्वयंपाकघर कधीही दुपारचे शांत डोळे मिटून लवंडलेले पाहिल्याचे मला आठवत नाही. आमचे घर अतिशय प्रशस्त आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. घरी कुलदैवत असल्याने कुळाचार वर्षभर होतात आणि माझे आईवडील मनाने अतिशय अघळपघळ, प्रेमळ देशस्थ आहेत, हे…

शहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली

मयूरेश भडसावळे कुतुबमिनार आठवतो हरहमेशा….दिल्ली म्हटलं की आधी कुतुबमिनारच आठवतो हरहमेशा ! सोनेरी उन्हात झळाळून निघालेला, अलवार धुक्यात गुरफटलेला, म्युरल्स, ग्राफिटीज, पेंटिंग्ज, सुव्हिनिअर पीसेसमधून डोळ्यांत भरणारा किंवा ‘तंत्रा’च्या टी-शर्टसवर, ‘चुंबक’च्या प्रॉडक्ट्सवर मिरवणारा, टुरिस्ट एजन्सीजच्या लोगोवर झळकणारा कुतुबमिनार ‘दिल्ली’ बनून राहतो अनेकांसाठी-जगभरात. प्रतीक! प्रतीकच !! स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, लाल किल्ला, जामा मस्जिद ,संसद भवन, नॉर्थ…

चिनी शाकाहारी पाहुणचार

शर्मिला फडके स्थळ : श्यूचं घर काळ : ड्रॅगन फेस्टिवल त्या आठवड्यात चिनी सण होता – ड्रॅगन फेस्टीवल. सुझन म्हणजे श्यू.  तिचा एसएमएस आला, “मी आईवडिलांच्या घरी जाणार आहे. तुला यायचंय का?” मी एका पायावर तयार झाले. श्यूचे वडील होंगियानपासून जरा लांब, लिन हाय नावाच्या शहराजवळ राहात होते. त्यांच्या पीचच्या बागा होत्या. ताज्या, तयार पीचची…

द रॉयल डच! – नेदरलंड

डॉ. विश्वास अभ्यंकर जर एखाद्या डच माणसाला तुम्ही विचारलंत की डच पाककृतीमध्ये विशेष काय आहे ? तर तो तोंड वेड-वाकडं करेल, खांदे उडवेल आणि कदाचित माफी पण मागेल, कारण तसं विशेष त्यांच्याकडे काही नाही. भारत, चीन, थायलंड, इंडोनेशिया हे सर्वच देश तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे आणि खाद्यपदार्थांमध्ये असलेल्या वैविध्यतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. पण नेदरलँड्ससारखेही काही देश आहेत…

देवभूमीची खाद्ययात्रा – गढवाल

अनन्या मोने देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं उत्तराखंड. त्यातला गढवाल प्रांत हा हरिद्वारपासून उत्तरकाशीपर्यंत पसरलेला आहे. त्याचे पौरी गढवाल, तेहरी गढवाल, चमोली गढवाल हे काही भाग अभयारण्य आणि हिमशिखरांसाठी प्रसिद्ध आहेत. जून १५ मध्ये मी ‘हर कि दून’ हा ट्रेक केला. तेव्हा त्या भागातलं गढवाली जीवन जवळून पाहायला मिळालं.  ट्रेक करण्याआधी आम्ही ऋषिकेशला जाऊन राफ्टिंग केलं….

दोन राज्यं, दोन खाद्यसंस्कृती

स्वाती शिंदे-जैन जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म…..हा लहानपणी जरी फक्त एक श्लोक वाटला तरी हॉस्टेलच्या लाईनमध्ये लागल्यावर जेव्हा ताटात  जेवण म्हणून जे काही आलं, ते बघून खरंच ब्रह्मदेव आठवले.  दक्षिणेतील त्या शहरात पोळी तर  मिळणार नाही हे एव्हाना लक्षात आलं होतं. त्यामुळे मग भात आणि त्यावर डाळ फ्राय म्हणून सांगण्यात आलेलं वरण आणि सोबत…