मुलं आणि पौष्टिक खाणं

मधुरा देव आज सकाळपासून दुसऱ्या, आठवड्यातल्या पाचव्या आणि महिन्यातल्या कितव्यातरी तक्रारीचं निराकरण करायच्या प्रयत्नात होते. तक्रार तरी कसं म्हणायचं याला? अक्षरशः हवालदिल झालेल्या पालकांना धीर देणे, हे मुख्य काम होऊन गेलं आहे. हरकत नाही! पालक आणि मूल हे वेगळं काढता येतच  नाही. परस्परावलंबी आहे हे नातं! इतर नात्यांपेक्षा जरा अधिक जबाबदारीची मागणी असलेलं. तर तक्रार…