चिनी शाकाहारी पाहुणचार

शर्मिला फडके स्थळ : श्यूचं घर काळ : ड्रॅगन फेस्टिवल त्या आठवड्यात चिनी सण होता – ड्रॅगन फेस्टीवल. सुझन म्हणजे श्यू.  तिचा एसएमएस आला, “मी आईवडिलांच्या घरी जाणार आहे. तुला यायचंय का?” मी एका पायावर तयार झाले. श्यूचे वडील होंगियानपासून जरा लांब, लिन हाय नावाच्या शहराजवळ राहात होते. त्यांच्या पीचच्या बागा होत्या. ताज्या, तयार पीचची…