कॅनडातल्या आईस वाईन

सतीश रत्नपारखी वाईन इतक्या प्रकारच्या असतात की त्यातल्या एका वाईनबद्दल काही चांगलं लिहिलं तर दुसऱ्या वाईनला राग येईल की काय असा प्रश्न पडतो! असो. आईस वाईन ही अत्यंत महागडी वाईन असते आणि तेवढीच चवदार सुद्धा . कॅनडामध्ये ओन्टारियो प्रांतात आइस वाईनची निर्मिती खूप प्रमाणात होते. तशी ती जर्मनी, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक,  फ्रान्स, हंगेरी, इटली,…

आखाती देशांतले गोड पदार्थ

वर्षा नायर दुबईत जेव्हा नवीन आले, १६ वर्षांपुर्वी तेव्हा माझ्या घराच्या शेजारीच लेबनीज (लेबनान देशातील) स्वीट्स शॉप होते. मी लग्न करून नुकतीच आले असल्याने लोक घरी जेवायला बोलावत. कधी ईदचे आमंत्रण तर कधी अजून काही. मग जाताना काहीतरी स्वीट घेऊन जावे म्हणून मी त्या शॉपमध्ये जायचे. खूप आकर्षक मांडणी होती, ज्याची कुणालाही भुरळ पडेल. आणि…

छेनापोडं आणि दहीबरा

भूषण कोरगांवकर चविष्ट, पौष्टिक आणि स्वस्त या तीन शब्दांत ओरिसाच्या, मी अनुभवलेल्या, खाद्यसंस्कृतीचं वर्णन होऊ शकेल. भात, सर्व डाळी, दही, भाज्या, मांस, मासे (विशेषतः गोड्या पाण्याचे), राईचं तेल, पनीर, खवा, साखर या पदार्थांचा इथल्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. चव, साहित्य आणि कृती या तिन्ही बाबतीत बंगाली खाद्यसंस्कृतीही बरंच साधर्म्य असलं तरी ओडिया पदार्थ हे आपली वेगळी, थोडीशी गावरान चव राखून आहेत. शिवाय चिंच, कढीपत्ता, डोशांचे प्रकार,…

जॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक

पूर्वा कुलकर्णी पूर्वा दुबईत राहाते. ती नुकतीच जॉर्जियाला जाऊन आली. तेव्हा काढलेले काही फोटो तसंच दुबई स्पाइस सूकचे काही फोटो तिनं शेअर केले आहेत.

काही युरोपिय पदार्थ

निखिल बेल्लारीकर बामी सूपः यात नूडल्स, थोडे घासफूस, आणि मोमोज़ असतात. त्यात shrimp आणि पोर्क यांचा एकत्र खिमा असतो. ही एक इंडोनेशियन डिश आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने इंग्लंडमध्ये भारतीय खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत तसेच डचांचे इंडोनेशियावर राज्य असल्याने हॉलंडमध्ये इंडोनेशियन खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत.   बकलावा: बेसिकली स्टफ्ड चिरोटा. सारण म्हणजे पिस्ते, बदाम इत्यादी असते. मी…

कला आणि खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके कोणत्याही कालखंडात, कोणत्याही संस्कृतीत बनलेला खायचा पदार्थ हा कधीच एकेकटा येत नाही, तो आपल्या अंगभूत रंगपोतासहित त्या त्या प्रदेशातली धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये सोबत घेऊन येतो. त्यातूनच खाद्यसंस्कृती विकसित होत जाते. मानवी इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील या खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण लिखित माध्यमांमधून झाले, तसेच दृश्यमाध्यमांमधूनही झाले. अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी या चित्रांमधून जितक्या सुस्पष्टतेनं उलगडतात…

कॉफिलिशिअस

प्राची मसुरेकर – वेदपाठक मी पहिल्यांदा कॉफी प्यायले माझ्या आजीबरोबर. ती जायफळ घातलेली, गोड दुधाळ कॉफी करायची. त्यात कॉफीची चव फार कमी होती. पुढे नेसकॅफेचे पाऊच आणून केलेली कॉफी, ऑफिसमधली रटाळ कॉफी, कॉफी डे मधली महाग कॉफी अशी ती बदलत गेली. पण सर्वात आवडली ती दक्षिणात्य फिल्टर कॉफी!  तिचा सुंदर वास आणि कडवट चव याला…

परदेशी खाद्यसंस्कृतीचा रसाळ अनुभव

आदिती चांदे-अभ्यंकर प्रत्येक देशाची अशी एक विशिष्ट  खाद्यसंस्कृती असते. भारतीय खाद्यसंस्कृतीत तर प्रचंड वैविध्य आहे. आपण पर्यटनासाठी अथवा वास्तव्यासाठी परदेशात गेलो असता शक्यतो आपली खाद्यसंस्कृती जपायचा आटोकाट प्रयत्न करतो. तेथेही आपलेच पदार्थ विकत मिळवायचा, उपलब्ध साहित्यातून आपल्या पद्धतीच्या जवळपास जाणारे पदार्थ करायचा सतत प्रयत्न सुरू असतो आपल्या बहुतेकांचा. म्हणूनच परदेशी पर्यटनास नेणाऱ्या कंपन्यांची चौकशी करताना…