मुळारंभ आहाराचा

मेधा कुळकर्णी आम्ही चौघीजणी भोजनगृहात आपापली जेवणाची ताटं घेऊन बसलो होतो. एक गरम भाकरी. सोबत खूपशी ओली हिरवी चटणी, मोठी वाटी भरून शेवग्याचं सूप, तेवढ्याच वाटीत मधुर चवीचं ताक, आणखी एक वाटी भरून तोंडल्याची रसदार भाजी, आमच्यातल्या एकीला भाकरीसोबत लोणीही मिळालं होतं. दोन- तीन घासांची चव घेतल्यावर आमचे शेरे सुरू झाले. सगळं तसं बरं आहे…..पण….!…