रसदार फॉन्ड्यू

मृदुला देशमुख-बेळे तीन वर्षांपूर्वी बौद्धिक संपदा कायदा शिकण्यासाठी चार महिने इटलीमध्ये राहायचा योग आला. माझा हा अभ्यासक्रम इटलीमधली तुरीन युनिव्हर्सिटी आणि जेनेव्हा, स्वित्झर्लंड इथली जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांनी एकत्रितपणे आयोजित केलेला होता. मी राहिले प्रामुख्याने तुरीन, इटली इथे. पण अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जेनेव्हा इथल्या जागतिक वायपोच्या कार्यालयात काही दिवस काम करण्याचा योग…