दोन राज्यं, दोन खाद्यसंस्कृती

स्वाती शिंदे-जैन जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म…..हा लहानपणी जरी फक्त एक श्लोक वाटला तरी हॉस्टेलच्या लाईनमध्ये लागल्यावर जेव्हा ताटात  जेवण म्हणून जे काही आलं, ते बघून खरंच ब्रह्मदेव आठवले.  दक्षिणेतील त्या शहरात पोळी तर  मिळणार नाही हे एव्हाना लक्षात आलं होतं. त्यामुळे मग भात आणि त्यावर डाळ फ्राय म्हणून सांगण्यात आलेलं वरण आणि सोबत…