झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल – आंध्र प्रदेश

विद्या सबनीस काही वर्षांपूर्वी माझ्या पतीची बदली आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्री या शहरात झाली. राजमुंद्री हे विशाखापट्टणमच्या जवळ आणि गोदावरीच्या काठावर वसलेलं टुमदार शहर आहे. इथे गोदावरी नदीचं पात्र इतकं मोठं आहे की तो समुद्र असावा अशी शंका यावी. माझे पती पूल बांधकामातले तज्ज्ञ आहेत. राजमुंद्रीतल्या नदीवर तीन किलोमीटर लांबीचा रेल्वे ब्रिज बांधला जाणार होता. आम्ही…

खाणारा-खिलवणारा मध्यप्रदेश

कथन – भारती दिवाण शब्दांकन – वंदना खरे आमचा मध्यप्रदेश अनेक कारणांसाठी सुप्रसिद्ध आहे. खजुराहोचे मंदीर, कान्हा किसली नॅशनल पार्क, महेश्वरी साडी, सांचीचा स्तूप, इंदौरच्या अहिल्याबाई होळकर, भोपाळची नवाबी संस्कृती, कुमार गंधर्वांचं गाणं या सर्वांसोबतच मध्यप्रदेशातलं खाणं-खिलवणंदेखील प्रसिद्ध आहे! मध्यप्रदेशची माव्याची जलेबी, गजक, इंदौरी चिवडा, दही कचोरी, छल्ला कचोरी, मावा वाटी असे अनेक पदार्थ खवय्यांना…