सिंधु ते ब्रह्मपुत्र – खाद्यसंस्कृतीचा धावता आढावा

सुनील तांबे उत्तर दिशेला भूखंडाने अडवलेला एकमेव महासागर म्हणजे हिंदी महासागर. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे मॉन्सून म्हणजे मोसमी वार्‍यांचं वा पावसाळ्याचं चक्र भारतीय उपखंडात प्राचीन काळापासून सुरू आहे. राजस्थानातील वाळवंट किंवा मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे पडणार्‍या पावसाचं प्रमाण मॉन्सूनमुळे निश्चित होतं. भारतीय उपखंडाचा भूगोल, मॉन्सून आणि व्यापारी मार्ग—खुष्कीचे वा सागरी, या घटकांनी आपली खाद्य संस्कृती निश्चित…