खमंग

मुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह. यातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक…

बलुतं

दलित आत्मकथनं हा मराठी साहित्यातला एक ठेवा आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ पुस्तकाने दलित आत्मचरित्राचा पाया घातला. ‘बलुतं’ने दलितांचं जे जगणं व्यक्त झालं त्याने मराठी वाचक हादरून गेले. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचा जीवनसंघर्ष व्यापकपणे सर्वांसमोर आला. या पुस्तकातला दलित खाद्यसंस्कृतीचं आकलन करून देणारा भाग वाचला आहे कौशल इनामदार यांनी. संगीतकार-गायक. मराठीच्या संवर्धनासाठी काम करणारे शिलेदार.

आयदान

मुळात स्त्रीचं जगणं पुरूषांच्या तुलनेत अवघड. त्यातही दलित स्त्री म्हणजे स्त्रीत्व आणि दलितत्व असा दुहेरी संघर्ष. दलित म्हणजे काय याची जाणीव झाल्यापासून एक स्त्री म्हणून जे जगणं वाट्याला आलं, त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचं आयुष्य ऊर्मिला पवार यांनी ‘आयदान’मधून मांडलं आहे.  आयदानमधला खानपानाबद्दलचा हा उतारा वाचला आहे चिन्मयी सुमीत यांनी. अभिनेत्री. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून…

अनंताश्रम

मुंबईतलं  गिरगावच्या सुप्रसिद्ध  खोताच्या वाडीतलं,  मुंबईच्या अस्सल कोकणी– गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारं अनंताश्रम. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी तर अनंताश्रमाची खुली जाहिरात करणं बाकी ठेवलं होतं असं म्हटलं जायचं. ते गिरगावातून दादरमध्ये राहायला गेले तरी गिरगावातल्या या खडप्यांच्या अनंताश्रमाला  विसरले नाहीत. दळवींचं खाण्यापिण्याबद्दलचं प्रेम सर्वश्रुतच होतं. मध्यमवर्गीय माणूस कदाचित पायही ठेवणार नाही अशी अनवट रेस्टॉरंट्स हुडकून दळवी तिथे…

भातपिठल्याची गोष्ट आणि पाडस

आधुनिक मराठी स्त्री कथा लेखिकांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विजया राजाध्यक्ष. त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांचं वर्णन करणा-या कितीतरी कथा लिहिल्या. विदेही हा त्यांचा गाजलेला संग्रह. या संग्रहात भातपिठल्याची गोष्ट ही म्हटली तर विनोदाची बारीकशी झालर असलेली आणि म्हटली तर विचार करायला लावणारी कथा आहे. पाडस हा मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या द इयरलिंग  या पुस्तकाचा राम…

भारतातली मुस्लिम खाद्यसंस्कृती

मुस्लिम खाद्यसंस्कृतीशिवाय भारतीय खाद्यसंस्कृतीचा विषय पूर्णच होऊ शकत नाही. बदायुनी लोकांनी भारतात ही खाद्यसंस्कृती आणली आणि इथल्या खाद्यसंस्कृतीनं तिला आपलंसं केलं. भारतातल्या इस्लामी खाद्यसंस्कृतीवर इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचाही मोठा प्रभाव पडलेला आहे. या खाद्यसंस्कृतीच्या या सगळ्या प्रवासाविषयी रंजक माहिती दिली आहे. खाद्यसंस्कृती अभ्यासक मोहसिना मुकादम यांनी. मोहसिना मुकादम या खाद्यसंस्कृती अभ्यासक आहेत. त्या रूईया महाविद्यालयात इतिहास…

माझा स्वयंपाक!

महेश एलकुंचवार हे लेखक म्हणून सगळ्यांनाच माहीत आहेत. पण महेशकाका फार उत्तम स्वयंपाक करतात आणि फार चवीनं जेवतात हे फार कमी जणांना माहीत आहे. १०-१२ वर्षांपूर्वी माझ्या सासुबाईंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर नागपूरला गेले होते. तेव्हा महेश काकांशी स्वयंपाकाबद्दल खूप गप्पा झाल्या. आम्ही दोघेही शाकाहारी, शिवाय दोघांच्या जेवणातल्या आवडी सारख्याच. त्यामुळे आमचं चटकन जमलं. डिजिटल…

ब्रेडची कहाणी

जगातल्या सगळ्या खाद्यसंस्कृतीमध्ये ब्रेड हा एक अविभाज्य भाग आहे. जवळपास सगळ्या देशांमध्ये या ना त्या प्रकारे ब्रेड खाल्ला जातोच. त्यामुळे जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकात ब्रेडचा सहभाग अपरिहार्य आहे. या अंकात ब्रेडबद्दल समीर समुद्र यांचा एक सुरेख लेख आहेच. पण ब्रेडबद्दल आम्ही बोलायचं ठरवलं बेकिंग तज्ज्ञ सई कोरान्ने-खांडेकर यांच्याशी. सईनं याविषयावर इतकी रंजक माहिती दिली आहे की…

शँक्स् : मराठी फाईन डायनिंग

आशय जावडेकर, गौतम पंगू, निलज रूकडीकर परवाच आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो होतो. मस्त पाव भाजी केली होती. ती खाता खाता आमचा मित्र श्रीधर म्हणाला, “मला नं दसऱ्याला मस्त पुरी, श्रीखंड, मसालेभात असं जेवायचंय. आपण पॉटलक करूया का?”. लगेच आमचा प्लॅन ठरला आणि आम्ही कुणी कुणी काय करायचं याच्या गप्पा पाव भाजी खात खात करू लागलो. हा…