रेल्वेची खानपान संस्कृती

हेमंत कर्णिक पुष्कळ, म्हणजे पुष्कळच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बीएससी झालो होतो पण नोकरी लागली नव्हती. खिशात पैसे असायचे, नसायचे. एकदा मी आणि माझ्याबरोबर ग्रॅजुएट होऊन बेकार असलेला माझा मित्र गप्पा मारण्यात इतके रमलो की शेवटची कर्जत निघून गेली. दादर स्टेशन घरासारखं वाटत असल्याने आणि अंगात तरुणपणाची रग असल्याने एक रात्र स्टेशनवर काढणे, हा इशू नव्हता….