चिनी आणि भारतीय रूचींचा मिलाफ – मलेशिया

स्नेहा पांडे लहानपणापासूनच चटकमटक खाण्याची सवय. मला रोज तेच खायला आवडायचं नाही आणि त्याहून तेच तेच पदार्थ बनवायला तर मुळीच नाही. त्यावेळी पोटात सगळं गेल पाहिजे म्हणून आई अगदी मागे लागून युक्तीयुक्तीने सगळं खाऊ घालायची. मग लग्नानंतर मी आणि माझा नवरा दोघेच पुण्यात राहू लागलो. तेव्हापासून माझी स्वयंपाकाची आवड खरी सुरु झाली. वेगवेगळे पदार्थ करून…

ब्रेडगाथा

समीर समुद्र पुण्यामध्ये  मोठं होत असताना मी फारसा ब्रेड कधी खाल्ला नाही. कधीतरी रविवारी सकाळी आम्ही चहाबरोबर ब्रेड आणि अमूल बटर खात असू. त्या वेळेस फक्त व्हाईट ब्रेड मिळायचा बेकरीमध्ये. आपण काहीतरी स्पेशल आणि युनिक करतोय असं वाटायचं तेव्हा ब्रेड खाताना. कारण ८०-९० च्या दशकात ब्रेड हा तसा मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाचा भाग नव्हताच. धिरडं, थालीपीठ,…