पु.ल.देशपांडे यांचं एक एव्हरग्रीन पुस्तक हसवणूक. रोजच्या जगण्यातल्या गंमतीदार निरीक्षणांमधून पुलंचा विनोद निर्माण होतो. ‘माझे खाद्यजीवन’ हे हसवणूक पुस्तकातलं प्रकरण खळखळून हसवणारं. जेवणातले विविध रंग, विविध चवी यांचं तितकंच चविष्ट वर्णन पुलंनी आपल्या या लेखातून केलं आहे. पुलंच्या लेखातल्या भागाचं वाचन करायचं तर अतुल परचुरेंशिवाय कोण करणार! अतुल परचुरे हे अभिनेता आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून,…
Tag: Marathi Abhivachan
खमंग
मुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह. यातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक…
बलुतं
दलित आत्मकथनं हा मराठी साहित्यातला एक ठेवा आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ पुस्तकाने दलित आत्मचरित्राचा पाया घातला. ‘बलुतं’ने दलितांचं जे जगणं व्यक्त झालं त्याने मराठी वाचक हादरून गेले. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचा जीवनसंघर्ष व्यापकपणे सर्वांसमोर आला. या पुस्तकातला दलित खाद्यसंस्कृतीचं आकलन करून देणारा भाग वाचला आहे कौशल इनामदार यांनी. संगीतकार-गायक. मराठीच्या संवर्धनासाठी काम करणारे शिलेदार.