ब्रेडची कहाणी

जगातल्या सगळ्या खाद्यसंस्कृतीमध्ये ब्रेड हा एक अविभाज्य भाग आहे. जवळपास सगळ्या देशांमध्ये या ना त्या प्रकारे ब्रेड खाल्ला जातोच. त्यामुळे जागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकात ब्रेडचा सहभाग अपरिहार्य आहे. या अंकात ब्रेडबद्दल समीर समुद्र यांचा एक सुरेख लेख आहेच. पण ब्रेडबद्दल आम्ही बोलायचं ठरवलं बेकिंग तज्ज्ञ सई कोरान्ने-खांडेकर यांच्याशी. सईनं याविषयावर इतकी रंजक माहिती दिली आहे की…

कला आणि खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके कोणत्याही कालखंडात, कोणत्याही संस्कृतीत बनलेला खायचा पदार्थ हा कधीच एकेकटा येत नाही, तो आपल्या अंगभूत रंगपोतासहित त्या त्या प्रदेशातली धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये सोबत घेऊन येतो. त्यातूनच खाद्यसंस्कृती विकसित होत जाते. मानवी इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील या खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण लिखित माध्यमांमधून झाले, तसेच दृश्यमाध्यमांमधूनही झाले. अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी या चित्रांमधून जितक्या सुस्पष्टतेनं उलगडतात…

हॉट पॉट – चीन

अपर्णा अमित वाईकर                     सात वर्षांपूर्वी जेव्हा शांघायला आले तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की इथे माझ्यासाठी चायनीज फूडचं विविध पदार्थांनी भरलेलं एवढं मोठं ताट वाढून ठेवलंय! माझा नवरा अमित याची जर्मनीहून इकडे बदली झाल्यामुळे या सुंदर शहरात आम्ही २००९ मध्ये आलो. चीनमध्ये काहीही खातात, अगदी कुठलाही…

टेस्ट ऑफ पॅरडाइज – इराण

कल्याणी केदार कुमठेकर “आपलं पुढचं पोस्टिंग आता इराण आहे” असं माझ्या नवर्‍याने, केदारने मला सांगितलं तेव्हा खरंतर खूप भीती वाटली. “इराण? दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाही का आपल्याला जाता येणार?” मी प्रतिप्रश्न केला. त्यावर त्याचं नेहमीचं उत्तर – “कल्याणी,  पापी पेट का सवाल है. जाना तो पडेगा.” माझ्या नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्हांला वेगवेगळ्या देशांमध्ये राहायची संधी मिळते….

डिस्कव्हरिंग घाना

सचिन म. पटवर्धन व्हॉलंटरी सर्विस ओव्हरसीज (व्हिएसओ) ह्या संस्थेतर्फे परदेशातील व्हॉलंटीयरींगसाठी माझी २०१० साली निवड झाली. त्यांनी मला जे वेगवेगळे प्लेसमेंटचे पर्याय दिले होते, त्यात पहिला होता बोंगो नावाच्या गावाचा. बोंगो हे   घाना या देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातील गाव. घाना हा पश्चिम आफ्रिकेतला देश. मी हा पहिलाच पर्याय स्वीकारला. हे ऐकल्यावर त्यावेळी बऱ्याच जणांना वाटत…

खाद्यभ्रमंतीचं एल डोरॅडो! – पेरू

पुष्पक कर्णिक (अनुवाद साहाय्य – नीलेश अग्निहोत्री) एल डोरॅडो – संपन्न, समृद्ध असं काल्पनिक शहर १९९३ सालापासून ‘Word Travel Awards’ हे जागतिक पर्यटन उद्योगात विशेष मान्यताप्राप्त आणि अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांच्या निवड समितीवर विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती असतात. २०१२ ते २०१५ अशी  सलग चार वर्षं ‘World’s Leading Culinary Destination’ हा सन्मान…

टर्किश डिलाइट – २

पूजा देशपांडे तुर्कस्तानची खाद्यसंस्कृती जगातल्या तीन सर्वांत मोठ्या चायनीज, फ्रेंच या खाद्यसंस्कृतीप्रमाणेच एक संपन्न खाद्यसंस्कृती आहे. तुर्कींची खाद्यसंस्कृती ॲनाटेलिया, मेडिटेरियन, मिड्लइस्ट, पूर्व युरोप, मध्य आशिया येथील लोकांच्या एकत्र येण्यामुळे संपन्न व वैविध्यपूर्ण बनली आहे. पदार्थांची रेलचेल असल्यामुळे तुर्की खाद्यपदार्थ जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे तुर्कस्तानच्या प्रत्येक भागाची स्वतंत्र अशी खासियत आहे. हा देश स्वत:ला पुरेल…

प्रेमात पडायला लावणारी पाककला – ग्रीस

मेघना चितळे आणि विक्रम बापट ग्रीस हा देश युरोप, आफ्रिका आणि आशिया या खंडांच्या मध्यात वसलेला असून तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, ऑलिंपिकबरोबरच पाककलेसाठीही ग्रीस जगप्रसिद्ध आहे. ग्रीक खाद्यजीवनावर जगाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही खाद्यसंस्कृतींचा प्रभाव जाणवतो. दक्षिणेला असलेल्या भूमध्य समुद्रामुळे ग्रीसला वैशिष्ट्यपूर्ण हवामान लाभलं आहे. या हवामानामुळे ग्रीसमध्ये भाज्या, फळं, धान्य, मासे,…

कृतज्ञ खाद्यसंस्कृतीचा देश – जपान

विभावरी देशपांडे ‘जपान’- उगवत्या सूर्याचा देश ! जगभरातल्या खवय्यांसाठी ‘सुशी आणि रामेन’चा देश! जपानी लोकांची शिस्तप्रियता, नीटनेटकेपणा याबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत. मेड इन जपान, म्हणजे तर परिपूर्णता आणि गुणवत्ता यांची खात्रीच. मग जपानी खाद्यसंस्कृती तरी याला अपवाद कशी असेल? जपानी लोकांचं परफेक्शनचं वेड त्यांच्या खाद्यसंस्कृतीतही प्रतिबिंबित होतं. उगाच नाही टोक्योला जगातली सर्वोत्तम फूड सिटी…

भारतीय आणि अफ्रिकन पाकशैलीचे फ्युजन – त्रिनिदाद

गौरव सबनीस न्यू यॉर्कमध्ये राहात असणाऱ्या क्रिकेटप्रेमीला जर कुठे प्रत्यक्ष जाऊन क्रिकेट पाहायचे असेल तर स्वस्त आणि सोईस्कर पर्याय म्हणजे वेस्ट इंडीज. जेमतेम चार-पाच तासांचा विमान प्रवास. शिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेने त्यांचे डॉलर त्यातल्या त्यात किरकोळ असल्यामुळे हॉटेल, खाणे-पिणे, प्रवास वगैरे अगदी परवडण्यासारखे. भारतीय क्रिकेट संघ  वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर येणार हे कळताच मी  इंटरनेटवर जाऊन…

मत्स्याहारी नॉर्वे

स्नेहा काळे नॉर्वे हा जेमतेम ५० लाख लोकवस्ती असलेला देश. म्हणजे आपल्या पुण्याएवढी लोकवस्ती म्हणा ना. पण अतिशय संपन्न आणि त्यामुळे महागडासुद्धा. त्यात सफरचंद आणि बेरीज सोडले तर फारसे काही पिकत नाही. सर्व काही आयात. जगाच्या नकाशावर पाहिले तर अगदी छोटासा देश. पण खडकाळ समुद्र किनारा आणि विलोभनीय सृष्टीसौंदर्याने नटलेला. त्यामुळे नॉर्वेजिअन लोकसुद्धा निसर्गप्रेमी. हवामानात…

वारूणीचा प्रदेश – जर्मनी

जयश्री हरि जोशी सर्जक, कलात्मक आणि शास्त्रीय क्षेत्रात सातत्यानं नवनवी शिखरे गाठणारा जर्मनी हा देश – कवींचा आणि विचारवंतांचा देश. फ्रान्ससारखे जिव्हालौल्याचा अनुनय करणारे, कोरीव, नाजूक, जीवघेण्या कलाकुसरीचे देणे ह्या खाद्यसंस्कृतीला लाभलेले नाही आणि इटलीच्या बेभान, उत्सवपूर्ण आणि जगण्याचा, रोजच्या खाण्यापिण्याचाही अगदी सोहळा करून टाकण्याच्या वृत्तीचा परीसस्पर्श ह्या भूमीच्या पाकशास्त्राला झालेला नाही. समुद्रसपाटीचे प्रदेश, डोंगरमाथे,…