उपेक्षित खाद्यसंस्कृती – आसाम

किमया कोल्हे आसाम म्हटलं की डेाळ्यासमोर येतो तो हिरवागार डोंगर, लांबच लांब चहाचे मळे आणि डोक्याला कपडा बांघून आणि पाठीला टोपली लावून चहा वेचणा-या आसामी बायका नाही का? निदान मला तरी तितकच माहीत होतं. जगभरातल्या एकूण चहा उत्पादनापैकी ६ टक्के चहा हा आपल्या आसाममध्ये होतो असे भूगोलात शिकवले होते किंबहुना पाठच करून घेतलेले शाळेत. त्यामुळे…

मद्यपान – एक चिंतन

आपल्या देशात आणि एकूणच संस्कृतीत मद्यपानाकडे फार चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. तर परदेशात मद्य हा बहुतेक खाद्यसंस्कृतींचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग हा फरक का? शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का? यासारख्या विचार करायला लावणा-या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे हृषीकेश जोशी यांनी आपल्या मद्यपान – एक चिंतन या लेखात. त्यांचा हा…

भारतातली मुस्लिम खाद्यसंस्कृती

मुस्लिम खाद्यसंस्कृतीशिवाय भारतीय खाद्यसंस्कृतीचा विषय पूर्णच होऊ शकत नाही. बदायुनी लोकांनी भारतात ही खाद्यसंस्कृती आणली आणि इथल्या खाद्यसंस्कृतीनं तिला आपलंसं केलं. भारतातल्या इस्लामी खाद्यसंस्कृतीवर इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचाही मोठा प्रभाव पडलेला आहे. या खाद्यसंस्कृतीच्या या सगळ्या प्रवासाविषयी रंजक माहिती दिली आहे. खाद्यसंस्कृती अभ्यासक मोहसिना मुकादम यांनी. मोहसिना मुकादम या खाद्यसंस्कृती अभ्यासक आहेत. त्या रूईया महाविद्यालयात इतिहास…

सिंधु ते ब्रह्मपुत्र – खाद्यसंस्कृतीचा धावता आढावा

सुनील तांबे उत्तर दिशेला भूखंडाने अडवलेला एकमेव महासागर म्हणजे हिंदी महासागर. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे मॉन्सून म्हणजे मोसमी वार्‍यांचं वा पावसाळ्याचं चक्र भारतीय उपखंडात प्राचीन काळापासून सुरू आहे. राजस्थानातील वाळवंट किंवा मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे पडणार्‍या पावसाचं प्रमाण मॉन्सूनमुळे निश्चित होतं. भारतीय उपखंडाचा भूगोल, मॉन्सून आणि व्यापारी मार्ग—खुष्कीचे वा सागरी, या घटकांनी आपली खाद्य संस्कृती निश्चित…