कॅनडातल्या आईस वाईन

सतीश रत्नपारखी वाईन इतक्या प्रकारच्या असतात की त्यातल्या एका वाईनबद्दल काही चांगलं लिहिलं तर दुसऱ्या वाईनला राग येईल की काय असा प्रश्न पडतो! असो. आईस वाईन ही अत्यंत महागडी वाईन असते आणि तेवढीच चवदार सुद्धा . कॅनडामध्ये ओन्टारियो प्रांतात आइस वाईनची निर्मिती खूप प्रमाणात होते. तशी ती जर्मनी, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक,  फ्रान्स, हंगेरी, इटली,…

आखाती देशांतले गोड पदार्थ

वर्षा नायर दुबईत जेव्हा नवीन आले, १६ वर्षांपुर्वी तेव्हा माझ्या घराच्या शेजारीच लेबनीज (लेबनान देशातील) स्वीट्स शॉप होते. मी लग्न करून नुकतीच आले असल्याने लोक घरी जेवायला बोलावत. कधी ईदचे आमंत्रण तर कधी अजून काही. मग जाताना काहीतरी स्वीट घेऊन जावे म्हणून मी त्या शॉपमध्ये जायचे. खूप आकर्षक मांडणी होती, ज्याची कुणालाही भुरळ पडेल. आणि…

छेनापोडं आणि दहीबरा

भूषण कोरगांवकर चविष्ट, पौष्टिक आणि स्वस्त या तीन शब्दांत ओरिसाच्या, मी अनुभवलेल्या, खाद्यसंस्कृतीचं वर्णन होऊ शकेल. भात, सर्व डाळी, दही, भाज्या, मांस, मासे (विशेषतः गोड्या पाण्याचे), राईचं तेल, पनीर, खवा, साखर या पदार्थांचा इथल्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. चव, साहित्य आणि कृती या तिन्ही बाबतीत बंगाली खाद्यसंस्कृतीही बरंच साधर्म्य असलं तरी ओडिया पदार्थ हे आपली वेगळी, थोडीशी गावरान चव राखून आहेत. शिवाय चिंच, कढीपत्ता, डोशांचे प्रकार,…

कॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको

चित्रलेखा चौधरी मेक्सिकोला जायचं ठरलं तेव्हा उत्साहाबरोबरच मनात थोडी धाकधूक होती. आधी जमैकाला जाऊन आल्यामुळे पॅकिंगचा थोडासा अनुभव होताच, पण तरी मेक्सिकोला काय मिळते,काय जेवण असते याबद्दल गुगलवर शोधणं चालू केले. तिकडे चिकन, मटण, मासे खात असतील याचा अंदाज होता पण गुगलवर शोधल्यावर कळलं की मेक्सिकोत चित्रविचित्र किडेदेखील खातात. पण मी चिकन आणि कधीतरी मटण आणि मासे खाते आणि शिवाय…

जॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक

पूर्वा कुलकर्णी पूर्वा दुबईत राहाते. ती नुकतीच जॉर्जियाला जाऊन आली. तेव्हा काढलेले काही फोटो तसंच दुबई स्पाइस सूकचे काही फोटो तिनं शेअर केले आहेत.

काही युरोपिय पदार्थ

निखिल बेल्लारीकर बामी सूपः यात नूडल्स, थोडे घासफूस, आणि मोमोज़ असतात. त्यात shrimp आणि पोर्क यांचा एकत्र खिमा असतो. ही एक इंडोनेशियन डिश आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने इंग्लंडमध्ये भारतीय खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत तसेच डचांचे इंडोनेशियावर राज्य असल्याने हॉलंडमध्ये इंडोनेशियन खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत.   बकलावा: बेसिकली स्टफ्ड चिरोटा. सारण म्हणजे पिस्ते, बदाम इत्यादी असते. मी…

मासे, तांदूळ आणि नारळ – केरळ

तनश्री रेडीज लग्नाच्या आधी मी आणि माझा होणारा नवरा असे दोघेही हॉस्टेलला राहत असल्याने हॉस्टेल मेसमध्ये मिळणारे जेवण हेच महाराष्ट्रीय जेवण असा जो सर्वसाधारण नॉन महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज होतो तसाच माझ्या केरळी नव-याचा सुद्धा झाला होता आणि तेव्हापासून माझी केरळी खाद्यसंस्कृतीशी ओळख झाली. “We Mallus have better food culture than you people. We have variety…

ओळख बटाट्याशी!

शिल्पा केळकर माझ्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण शेवटी बटाटा करेल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण झालं मात्र तसं. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर, कितीतरी जास्त उचित कारणं होती, ज्यानं तसं झालं असतं, तर फार वावगं वाटलं नसतं. पण तशा बर्‍याच प्रसंगांना धीरानं तोंड दिलं आणि शेवटी बटाट्याने मात्र घात केला. गाडी उजव्या बाजूला चालवण्याऐवजी, चुकीच्या…

लोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश

शक्ती साळगावकर-येझदानी हिमाचल प्रदेश हे नावच इतकं सुंदर आहे, की हे नाव ऐकताच सुंदर बर्फाची पांढरीशुभ्र ओढणी घेऊन स्वागताला उभी असलेली एक स्त्री डोळ्यासमोर येते. मी पहिल्यांदा या सुंदर प्रदेशात जायचा प्लॅन केला तो एका पंधरा दिवसाच्या ट्रेकिंग ट्रिपसाठी. टूर कंपनीने पाठवलेल्या, ट्रिपवर नेण्याच्या सामानाच्या यादीत माकडटोपी, लाँग जोनस् (लोकरीचा पायजमा), लोकरीचे पायमोजे, मफलर, लेदरचे…

मासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा

मनस्विनी प्रभुणे -नायक गोवेकरांचं पहिलं प्रेम हे फक्त आणि फक्त ‘नुस्त्यां’वर (मासळीवर) असतं. इथे मासळीला ‘नुसते’असं म्हणालं जातं. मासळीशिवाय गोमंतकीयांचे जेवण अपूर्ण आहे. मासळी बाजारात गेल्यावर स्वतःपेक्षा शेजारची व्यक्ती कोणती मासळी घेतेय याकडे जास्त लक्ष असतं. रस्त्यात कोणी भेटला तर त्याची ख्यालखुशाली विचारण्याऐवजी ‘आज कोणते नुसते आणले?’ हे सहज विचारलं जातं. कोणाचा फोन आला तर गप्पांमध्येही आज…

सिनेमातली खाद्यसंस्कृती

शर्मिला फडके आणि सायली राजाध्यक्ष बरजात्यांच्या एका गोड-गुळगुळीत सिनेमात (बहुतेक हम साथ साथ है) नेहमी असतो तसाच एक कुटुंबियांनी मिळून एकत्र जेवण्याचा सीन आहे. कुटुंबप्रमुख आलोकनाथ आपल्या २५-३० माणसांच्या कुटुंबकबिल्यासमवेत एका भल्यामोठ्या, साधारण दोनशे लोकांना पुरेल इतकं खाणं मांडून ठेवलेल्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलेला असताना आपल्या प्रेमळ कुटुंबियांकडे एक (साजूक) तुपकट कटाक्ष टाकून उद्गारतो,” फॅमिली…